विभागाचे कार्य व उपक्रम.
मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळया योजना व उपक्रमाव्दारे करणेत येते. तसेच शासनाच्या धोरणात्मक आदेशानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २० % निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणेसाठी सदर योजनांची अंमलबजावाणी व नियंत्रणाचे कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मा. समाज कल्याण समिती करते. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना,शासन निर्णय व परिपत्रकान्वये या निधीमधुन खालीलप्रमाणे योजना राबविणेत येतात.
समाज कल्याण विभागाच्या विविध योजना.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे.
योजनेचे स्वरुप :
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिमेंट रस्ते/नाली बांधकाम, स्वच्छता विषयक सोयी, मलनिस्सारण, वीज, वस्तीला जोडणारे रस्ते, समाज मंदिर इत्यादी व्यवस्था करुन वस्तीची विकास करण्यासंबंधी ही योजना आहे.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- सदर काम मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्यक. वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा वस्तीच्या आवशक्यतेनुसार कामे घेण्यात येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. | लोकसंख्या | अनुदान रक्कम (लाखात) |
---|---|---|
1 | 10 ते 25 | 2.00 लाख |
2 | 26 ते 50 | 5.00 लाख |
3 | 51 ते 100 | 8.00 लाख |
4 | 101 ते 150 | 12.00 लाख |
5 | 151 ते 300 | 15.00 लाख |
6 | 301 च्या पुढे | 20.00 लाख |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने.
योजनेचे स्वरुप :
- प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाचे उत्पन्न लक्षात न घेता सर्व पातळीवर शिक्षण फी व परीक्षा फी इ. 10 वी च्यात विद्यार्थ्यां साठी वार्षीक रु. 300/- प्रमाणे देण्यात येते. ज्याची प्रतिपुर्ती शाळांना करण्यात येते. नियम, अटी व पात्रता इ. : विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वि.जा.भ.ज. प्रवर्गातील असावा.
माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृती.
योजनेचे स्वरुप :
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या त्या माध्यमिक शाळांमधील 5 वी ते 10 वी च्या प्रत्येक ईयत्तेमधून पहिला व दुसरा असे प्रत्येकी दोन विद्यार्थी याप्रमाणे ही शिष्यवृत्ती दिली जाते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- विद्यार्थी हा मागासवर्गीय अनु. जाती, अनु.जमाती व विजाभज प्रवर्गातील असावा 50 % पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
- इयत्ता 5 वी ते 7 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 50/- प्रमाणे 10 महिनेसाठी 500/- रुपये दिली जाते.
- इयत्ता 8 वी ते 10 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये दिली जाते.
खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क फी प्रतिपूर्ती.
योजनेचे स्वरुप :
- खाजगी विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिद्गय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- विद्यार्थी हा दारिद्गय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जाती, अनु.जमाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा
- शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती संबंधीत शाळांना केली जाते, त्याचे दर खालील प्रमाणे आहेत..
1) इयत्ता 1 ते 4 थी प्रतिमाह 100/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1000/- रुपये.
2) इयत्ता 5 ते 7 वी प्रतिमाह 150/- प्रमाणे 10 महिनेसाठी 1500/- रुपये.
3) इयत्ता 8 ते 10 वी प्रतिमाह 200/- प्रमाणे 10 महिनेसाठी 2000/- रुपये.
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती.
योजनेचे स्वरुप :
सदर योजनेत अस्वच्छ व्यवसायात काम करणार्याी पालकांच्या दोन पाल्यांना केंद्गस्तर 50% रु. 925/- व राज्यस्तर 50% रु. 925/- प्रमाणे 10 महिन्यासाठी एकूण रु. 1850/- शिष्यवृत्ती दिली जाते. सदर अनुदान 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
नियम, अटी व पात्रता इ. :
या योजनेत मुलांचे पालक हे कातडी कमावणे, कातडी सोलणे, मैला सफाई करणे व कचरा कागद गोळा करणे यासारखे अस्वच्छ व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणार्याफ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणार्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
अ.क्र. | इयत्ता | शिष्यवृत्ती दर | कालावधी |
---|---|---|---|
1 | 5 वी ते 7 वी | दरमहा रु. 60/- प्रमाणे रु.600/- | एकूण 10 महिने |
2 | 8 वी ते 10 वी | दरमहा रु.100/- प्रमाणे रु.1000/- | एकूण 10 महिने |
- नियम, अटी व पात्रता इ. :
- उत्पन्न व गुणाची अट नाही.
- संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
- 75% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
- लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.
इ.9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृती
योजनेचे स्वरुप :
- अनुसुचित जातींच्या विद्यार्थ्यां चे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हायवे या उद्देशाने केंद्र शासनाने दि.1 जुलै 2012 पासुन इ.9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृती योजना सुरु केली आहे.
अ.क्र. | योजना | वसतिगृहात न राहणारे (अनिवासी) | वसतिगृहात राहणारे (निवासी) |
---|---|---|---|
1 | शिष्यिवृतीचे दर (प्रतिमहा) | रु. 150/- | 350/- |
2 | पुस्तिके व अनुदान (वार्षीक) | रु. 750/- | 1000/- |
- नियम, अटी व पात्रता इ. :
- सदर योजना शासकिय मान्य्ताप्राप्त् शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
- सदर योजनांतर्गत शिष्ययवृतीच्यात विद्यार्थ्यां च्याा पालकाच्या4 उत्पनन्नायची मर्यादा रु.2.00 लक्ष इतकी असावी.
- यामध्येआ विद्यार्थ्यां स किमान गुणाची अट नाही.
- सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यायने अर्ज करणे आवश्यटक आहे.
- सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यजमिकपुर्व शिष्यवृतीच्या लाभार्थ्यांना लागु राहणार नाही.
योजनेचे स्वरुप :
- अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना लागू आहे.
- अनुसूचित जातीच्या लाभधारक विद्यार्थ्यांना दरमहा रु. 100/- प्रमाणे 10 महिन्याला रु. 1000/- विद्यावेतन दिले जाते.
- ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून रु. 40/- विद्यावेतन मिळते अशा विद्यार्थ्यांला सामाजिक न्याय विभागाकडून रु. 60/ प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- सदर योजना शासकिय मान्य्ताप्राप्त् शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांसाठी लागु राहील.
- विद्यार्थी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित असावा व नियमितपणे हजर असावा.
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन व अर्थसहाय्य.
योजनेचे स्वरुप :
- समाजातील जातीयता नष्ट व्हावी म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते. यामध्ये केंद्गस्तर 50 टक्के व राज्यस्तर 50 टक्के हिस्सा याप्रमाणे एकूण रु. 50000/- एवढे अर्थसहाय्य विवाहीत जोडप्यांना दिले जाते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- या योजनेमध्ये एक व्यक्ती मागासवर्गीय व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शीख यामधील असावा. तसेच मागासवर्गीयातील अनु. जाती व जमाती विमुक्त जाती / भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील आंतरजातीय विवाहीतांनाही याचा लाभ दिला जातो.
मागासवर्गीय वस्तीगृहांना सहाय्यक अनुदान प्रदाने.
योजनेचे स्वरुप :
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा, ग्रामीण भागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरावस्थेमुळे पालकांना मुलांच्या शिक्षात अडचणी येऊ नयेत व विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत एकूण 108 वस्तीगृह कार्यरत असून त्यामध्ये 4803 विद्यार्थ्यांचे निवास / योजनाचा विनामुल्य सोय केली जाते. यासाठी शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांना प्रति विद्यार्थी प्रतिमहा रु. 900/- प्रमाणे अनुदाने दिले जाते व अधिक्षक यांना रु. 10000/-, स्वयंपाकींना रु. 8500/-, मदतनीस रु. 7500 /-, पहारेकरी यांना रु. 5000/- असे प्रतिमहा मानधन अदा केले जाते. इमारत भाड्यापोटी, सा. बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75% अनुदान संस्थेस देण्यात येते.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. (विहित टक्केवारी नुसार प्रवेश)
- 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
- वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यारचे आधार कार्ड असणे आवश्येक.
- विद्यार्थी महाराष्ट्रि राज्या्तील रहिवाशी असावा.
शालांतपूर्व शिक्षण घेणार्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
- अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी योग्य त्या अपंगाना राज्य शासन शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- अर्जदार प्राथमिक इयत्ता 1 ते 10 पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारा असावा.
- शिष्यवृत्तीचे दर: इयत्ता 1 ते 4 रु. 100/- इयत्ता 5 ते 7 रु. 150/-इयत्ता 8 ते 10 रु. 200/- याप्रमाणे दहा महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना.
योजनेचे स्वरुप :
- अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी योग्य त्या अपंगाना राज्य शासन शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहे.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- अपंग विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. चालु शैक्षणिक वर्ष 2014-15 पासुन सदरील शिष्यनवृतीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. | गट | निवासी (दरमहा) | अनिवासी (दरमहा) |
---|---|---|---|
1 | गट- अ | रु. 1200/- | 550 |
2 | गट- ब | रु. 820/- | 530 |
3 | गट- क | रु. 820/- | 530 |
4 | गट- ड | रु. 570/- | 300 |
5 | गट- इ | रु. 380/- | 230 |
त्याचबरोबर निर्वाह भत्तान, सक्तीचे शुल्क, अभ्यासदौरा, वाचकभत्ता व प्रकल्प खर्च इ.देण्यात येतात.
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना.
योजनेचे स्वरुप :
- अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के एवढी रक्कम अनुदान व 80 टक्के एवढी रक्कम बँकेकडून कर्जरुपात देणे.
- नियम, अटी व पात्रता इ. :
- वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 100000/- व प्रकल्प खर्चाची मर्यादा रु. 150000/- आणि वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.
वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 100000/- व प्रकल्प खर्चाची मर्यादा रु. 150000/- आणि वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे.
योजनेचे स्वरुप :
- अ) जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रकमेतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय व्यक्तीना व महिला यांच्यासाठी खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी वेगवेगळया योजना घेतल्या जातात.
- 1.ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना लोखंडी बैलगाडी पुरविणे.
- 2.ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना मिनी दालमील पुरविणे.
- 3.ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना मिरची कांडप पुरविणे
- 4.ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे
- 5.ग्रामीण भागातील मागासवर्गीया शेतक-यांना ठीबक संच पुरविणे
- 6. .ग्रामीण भागातील मागासवर्गीया शेतक-यांना तुषार संच पुरविणे
- 7.ग्रामीण भागातील मागासवर्गीया घरकुल योजना अर्थसहाय्य् पुरविणे.
- ब) जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नातून समाजकल्याण विभागास प्राप्त होणा-या दिव्यांगासाठीच्या 5 टक्के रकमेतून खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या प्रतिवर्षी वेगवेगळया योजना घेतल्या जातात.
- 1.ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी झेरॉक्स् मशीन पुरविणे.
- 2.ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविणे.
- 3. ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी बहुविकलांगांना स्वयंचलित सायकल व खुर्ची पुरविणे
डॉक्युमेंट अपलोडेड नाही
डॉक्युमेंट अपलोडेड नाही