ग्रामपंचायत स्तर कार्यालय तपासणी
जालना जिल्ह्यात 778 ग्रामपंचायती आहेत ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्रे पशुवैद्यकीय दवाखाने व ग्रामपंचायत ही स्थानिक कार्यालय असतात या कार्यालयामार्फत ग्राम स्तरावरील नागरिकांना विविध सेवा पुरवल्या जातात या सेवा गुणवत्ता पूर्ण व तातडीने पुरविणे व ग्रामपंचायत स्तरावरील गुणवंत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत स्तरावरील कार्यालयांची तपासणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग या विभागांतर्गत शंभर गुणांची गुणतालिका करून प्रत्येक कार्यालयाची तपासणी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत करण्यात येणार आहे.
याकरिता या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल त्याचप्रमाणे ज्या कार्यालयांना चांगले गुण पडतील त्या कार्यालयांचा सत्कार जिल्हा पातळीवर करण्यात येऊन ज्या कार्यालयांना कमी गुण मिळतील त्या कार्यालयांना गुण वाढीसाठी संधी देण्यात येईल हा उपक्रम राबविल्याने जिल्ह्यातील स्थानिक कार्यालयांची गुणवत्तेत निश्चित भर पडणार आहे
Super Thirty
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्रशाला, कस्तूरबा गांधी बालिका विदयालये येथे अनेक हूशार व प्रतिभावान विदयार्थी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात. ग्रामीण भागातून इयत्ता 10 वी चे शिक्षण पूर्ण करणा-या अशा हूशार व प्रतिभावान विदयार्थ्यांना 10 वी नंतर इच्छा असूनही घरच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी शिकवणी घेता येत नाही. खाजगी शिकवणीचे NEET/JEE परिक्षेच्या फीस हया लाखो रुपयात असून त्याशिवाय राहण्याचा वेगळा खर्च करावा लागतो. म्हणजेच इयत्ता 11 वी 12 मध्ये शिकत असतांना NEET/JEE च्या तयारीसाठी साधारणत: 3 ते 4 लक्ष रुपये खर्च येतो. त्यामूळे ग्रामीण भागातील विदयार्थी हे स्वत:मध्ये पात्रता असतांनाही ते धरच्या आर्थिक परिस्थितीमूळे NEET/JEE ची तयारी करु शकत नाही. पर्यायांने त्यांनी लहानपणी स्वत:च्या मनाशी ठरविलेले त्यांचे डॉक्टर/इंजिनिअर होण्याचे स्वप्न अर्धवट राहते.
डॉक्टर/इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणा-या अशा प्रतिभावान विदयार्थ्यांचा शोध घेऊन ते पूर्ण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषद जालना अंतर्गत जिल्हा परिषद सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी तसेच समाज सहभाग मिळवून अशा विदयार्थ्यांचे स्वप्न पुर्ण करता यावे म्हणून जिल्हा परिषद जालना अंतर्गत जिल्हा परिषद मुलांची परिसर जालना येथे जिल्हा परिषद निवासी क्रिडा जवळ NEET/JEE/IIT परिक्षा पुर्व तयारीसाठी परिक्षा मार्गदर्शन अभ्यास केंद्राची निर्मिती जि.प. मुलांची प्रशाला स्टेशन रोड जालना येथे करण्यात आलेली आहे.
परिक्षा मार्गदर्शन केंद्रात जिल्हयातील 32 जिल्हा परिषद प्रशाला, 07 कस्तूबरबा गांधी बालिका विदयालयात शिकणा-या इयत्ता 10 वी च्या विदयार्थ्यांमधून 120 गुणाच्या चाळणी परिक्षेतून 15 मुले आणि 15 मुलींची निवड करुन एकूण 30 मुलांसाठी हे परिक्षा मार्गदर्शन अभ्यास केंद्र असेल. या अभ्यास केंद्रात दाखल होणा-या सर्व 30 मुलांची निवास, चहानाष्टा व भोजनाची व्यवस्था त्या ठिकणी करण्यात येणार असून ते केंद्र निवासी स्वरुपाचे असेल. या अभ्यास केंद्रासाठी भौतिक शास्त्र, गणित, जिवशास्त्र व रसायण शास्त्र या 04 विषयासाठी 04 तज्ञ मार्गदर्शक शिक्षक दरमहा रुपये 25000/- मासिक मानधनावर नियुक्त करण्यात येतील. मुलांच्या राहण्यासाठी क्रिडा प्रबोधीनीच्या शेजारी असलेल्या 5 वर्गखोल्यांमध्ये सुधारणा करुन सुसज्ज निवास व्यवस्था करण्यात येईल. ज्याठिकाणी अभ्यासपूरक वातावरण असेल. या अभ्यास केंद्रासाठी एक व्यवस्थापक व सफाई कर्मचारी नियुक्त करावा लागेल. सदर अभ्यास केंद्राच्या लेखा विषयक व प्रशासकिय बाबी हया जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधीनीचे कामकाज पहाणारे अधिकारी/कर्मचारी हे पाहतील. विदयार्थ्यांचे निर्वाह खर्च हा जि.प.सेस फंडातून तसेच समाज सहभागातून करण्यात येईल. सदरचे अभ्यास केद्र हे जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधीनीला सलग्न असेल त्यामूळे अभ्यास केंद्रातील विदयार्थ्यांच्या निवास, भोजन व अडीअडचणीची संपूर्ण जबाबदारी ही प्रबोधीनीच्या गृहप्रमूखांची असेल.
1 | जालना येथे Super Thirty उपक्रमांतर्गत JEE/IIT/NEET परीक्षेच्या पूर्वतयारी शिकवणी वर्ग सुरू करण्याचे अनुषंगाने दिनांक 02/06/2023 रोजी विद्यार्थ्यांची निवड चाळणी परीक्षा आयोजित करणे बाबत. |
स्पर्धा परीक्षांसाठी केंद्रीय वाचनालय
MPSC, UPSC,CDS तसेच गट-क स्पर्धा परिक्षांच्या पुर्व तयारीसाठी, वातानुकलीत सुसज्ज केंद्रीय वाचनालय (Central Library)/अभ्यासिका
जिल्हयातील ग्रामीण भागातील मूला मूलींना शालेय शिक्षणा नंतर महाविदयालयीन शिक्षण घेत असतांना त्यासोबतच शालेय जिवनापासूनच स्पर्धा परिक्षा/ शिष्यवृत्ती परिक्षा इत्यादींची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी म्हणून विदयार्थ्यांना माध्यमिक शिक्षणा पासुनच वाचनाची सवय लागली तर ते विदयार्थी नक्कीच भविष्यात स्पर्धा परिक्षेला समर्थपणे सामोरे जाऊन स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊन अधिकारी होतील आणि जालना जिल्हयाची मान उंचावतील या उदात्त हेतूने जालना शहरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, जेईएस कॉलेजसमोर, जालना येथे केंद्रीय वाचनालय (Central Library)/अभ्यासिका 1 जुलै 2023 पासुन प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जालना यांचे मार्फत सुरु करण्यात येत आहे.
वाचनालयाचे स्वरुप : खालावलेल्या आर्थीक परिस्थितीमूळे अनेक कूंटुंबातील अनेक हूशार विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याची इच्छा असूनही घरच्या खालावलेल्या आर्थीक परिस्थितीमूळे ती करता येत नाही. अशा सर्व होतकरु, हूशार विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारी महागडी पुस्तके, अभ्यासासाठीची जागा इत्यादी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जालना शहराचे ठिकाणी स्पर्धा परिक्षा अभ्यासासाठी शांतपणे बसून अभ्यास करता यावा, त्यांना संदर्भ पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
सदर वाचनालयात/अभ्यासिकेत एका वेळेस किमान 30 मुले अभ्यास/वाचन करु शकतील अशा वातानुकलीत सुसज्ज व्यवस्थेसह प्रायोगिक तत्त्वावर जालना शहरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जेईएस कॉलेजसमोर, जालना येथे दिनांक 1 जूलै 2023 पासुन सुरु करण्यात येत आहे.
स्पर्धा परिक्षेच्या प्रेरणेने तयारी करणा-या मुलांना वाचनालय/अभ्यासिके मध्ये खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
1. अभ्यास करण्यासाठी सुसज्ज वातानुकुलीत कक्ष.
2. अभ्यासपुरक बैठक व्यवस्था,
3. पुर्णवेळ ग्रंथपालाची उपलब्धता.
4. MPSP-UPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांचे तयारी साठी भरपूर पुरक पुस्तकांची व मासिकांची उपलब्धता.
5. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु.
6. नविन घडामोडी व पूरक वाचनासाठी सर्व दैनंदिन वर्तमानत्रांची उपलब्धता.
7. MPSP-UPSC व अन्य स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी झालेल्या विदयार्थ्याकडून मार्गदर्शन/व्याख्याना ची सोय.
8. स्वच्छतागृह व आर.ओ. पिण्याच्या पाण्याची सुविधा.
सदर वाचानालय/अभ्यासिकेत कोण प्रवेश घेऊ शकेल?
1. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणा-या / जिल्हा परिषद शाळांमधून 10 वी पास झालेल्या मुलांना मोफत प्रवेश.
2. खाजगी माध्यमिक शाळांमध्ये शिकणा-या व खाजगी माध्यमिक शाळांमधून 10 वी पास झालेल्या विदयार्थ्यांना अत्यल्प म्हणजे दरमहा रुपये 1000/- ची शुल्क आकारणी.