प्रस्तावना :-
जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी सबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून वरिष्ठ लेखा अधिकारी (वर्ग1) व तीन लेखा अधिकारी (वर्ग2) असतात. त्याच्या सल्ल्याशिवाय कोणताही प्राधिकारी आर्थिक व्यवहारास मंजुरी देत नाही.
अर्थ समितीचा तपशील वित्त समितीच्या कामासंबधी तपशीलः- मासिक लेखे व वार्षिक लेख्यास मंजूरी देऊन स्थायी व जिल्हा परिषद सभेपुढे मंजुरीसाठी सादर करणे विषय समितीच्या मासिक सभेमध्ये दरमहा येणारे विषय :-
- मासिक लेख्यांस मान्यता देणे
- दर तीन महिन्यांनी लेखाविषयक नोंदवहयांचा आढावा घेणे
- जिल्हा परिषद सदस्यांच्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रवास भत्ते अदाईस मंजुरी देणे
- पुरवणी व सुधारित अंदाजपत्रक विषय समितीपुढे अवलोकनार्थ ठेऊन मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेकडे शिफारस करणे.
- अर्थ विभागाकडील वार्षिक प्रशासन अहवाल व कार्यक्रम अंदाजपत्रक यांस मंजूरी देणे.
- जिल्हा परिषदेचे वार्षिक लेख्यांबाबत कमी जास्त जमा खर्चाच्या कारणांचे तसेच पंचायत समिती वाढीव उपकर निधीचे कमी जास्त जमा खर्चाच्या कारणांचे अवलोकन करून मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेकडे शिफारस करणे
- घसारा पुनर्स्थापन व दुरुस्ती निधीची रक्कम जिल्हा निधीत जमा करण्यास मा.स्थायी समितीकडे शिफारस करणे.
- स्थानिक निधी लेखा परिक्षण प्रथम अनुपालनास मंजूरी देणे.
डॉक्युमेंट अपलोडेड नाही
संदर्भ | फाईल |
---|---|
In Zp All Department Only | view |