जालना जिल्हा देवालयासाठी प्रसिध्द असुन राजुर ता. भोकरदन येथील गणपतीचे मंदीर , अन्वा ता. भोकरदन येथील माहेश्वराचे मंदिर आणि अंबड येथील मत्सोदरी देवीचे मंदिर तसेच नेर ता. जालना येथील वटेश्वराचे मंदिर , परतुर येथील नरसिंहाचे मंदिर , जालना शहरातील भैरवनाथाचे मंदिर, गणपती मंदिर, राम मंदिर, महानुभाव व जैन मंदिर देखिल प्रसिध्द आहे. तसेच जालना शहराच्या मध्यभागी जनार्धन मामांचा पुतळा आहे तसेच नागेवाडी येथील नालंदा बुध्द विहार प्रसिध्द आहे.
1. समर्थ रामदास स्वामी :- समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे झाला. त्यांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहले आहेत. त्यांनी लोकांना देशाभिमानाची शिकवण दिली.
2. आनंदी स्वामी :- येथे आनंदी स्वामी नावाचे थोर संत होऊन गेले ते सर्वांशी समानतेने वागत. गरीबांना मदत करीत , जालना येथे त्यांची समाधी आहे.
3. जानअली व बाबाअली शहा :- जानअली व बाबाअली शहा हे संत देखिल याच जिल्ह्यात होऊन गेलेत. जालना शहरात त्यांचे दर्गे आहेत. व तेथे दरवर्षी उरुस भरतो.
4. राजुर :- भोकरदन तालुक्यातील राजुर येथे गणपतीचे मंदीर असुन संपुर्ण देशभरातुन मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनास येतात.
At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.