बलवंतराव मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अश्या प्रकारे पंचायत राज पध्दतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.
जिल्हा परिषद (सामान्यतः जि . प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.
जालना जिल्हा परिषदेची स्थापना १ मे रोजी झाली सध्या जालना जिल्हा परिषदेत जालना, बदनापूर, अंबड घनसांगावी, भोकरदन, जाफ्राबाद, परतुर व मंठा ह्या आठ पंचायत समित्या समाविष्ठ आहेत. जिल्हा निर्मितीच्या वेळी जुन्या औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद या चार पंचायत समित्या व परभणी जिल्ह्यातील परतूर समिती जालना जिल्हा परीषदेमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या.
जणगणना २०११ नुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या १९.५८ लक्ष आहे. जिल्ह्यात एकूण ७७८ ग्राम पंचायती असुन त्या अंतर्गत एकूण ९७२ गावे आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्यालय अंबड रोड वर स्थित आहे.
At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.