आरोग्य विभाग

  • Home
  • आरोग्य विभाग

अ) प्रसुतीपूर्व काळजी :-

सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत) गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी :- पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे) संलग्र आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तक्षयाकरिता तपासणी, पोटावरुन तपासणी, उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अ‍ॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अ‍ॅसिड गोळयांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार) प्रयोगशाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी. जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व तत्पर योग्य ठिकाणी संदर्भसेवा.

ब) प्रसुतीदरम्यान सेवा :-

आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे) स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे. तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.

क) प्रसुतीपश्चात सेवा :-

प्रसुतीपश्चात कमीत कमी २ वेळा गहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. सल्ला व समुपदेशन :- आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोधन, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, ए.आय.व्ही.एड्‌स इ.बाबत.

प्रसुतीपश्चात काळजी :-

उपकेंद्गाच्या कर्मचार्‍यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी :- पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत. प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे. आहार, स्वच्छता, कुटूंबनियोजनाबाबत आरोग्य शिक्षण देणे.

ड) बालकाचे आरोग्यः-

  • नवजात अर्भकाची काळजी
  • ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
  • सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द लसीकरण करणे.
  • ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
  • बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.
  • अ) नवजात अर्भकाची काळजी :-
  • नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञसेवा

नवजात अर्भकामधील तापमान कमी होण व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.

  • ब) बालकाची काळजीः-
  • नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह ( IMNCI ) आजारी बालकांची तातडीची काळजी.
  • बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
  • जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
  • लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
  • अ जीवनसत्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.

कुटूंबनियोजन आणि गर्भनिरोधन :-

कुटूंबकल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे, प्रवत्त करणे व समुपदेशन करणे. कुटूंबनियोजनाच्या साधनांची उपलब्धता – निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तात्काळ गर्भनिरोधन इ. कुटूंबकल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्‍या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा. आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा.

पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :-

आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा शालेय आरोग्य सेवेसाठी मदत

उपचारात्मक सेवा :-

किरकोळ आजारावर औषधोपचार उदा.ताप, अतिसार, श्वसनसंस्थेचे आजार, जंताचे विका, अपघात व तात्कालिक परिस्थितीत करावयाचे प्रथमोपचार. तत्पर व योग्य संदर्भसेवा. प्राथमिक आरोग्य केंद्गाचे वैद्यकीय अधिकारी आशा अंगणवाडी सेविका, पंचायत राज संस्था, स्वयंसहाय्यता गट यांच्या मदतीने अंगणवाडीमध्ये कमीतकमी दरमहा एक आरोग्य दिवस आयोजित करणे.

जीवनविषयक घटनांची नोंद:-

जन्म – मत्यू, मातामत्यू , अर्भकमत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)

अ) वैद्यकीय सेवा

बाहयरुग्ण सेवा :- ४ तास सकाळी व २ तास संध्याकाळी.
२४ तास तातडीची सेवा :- जखमा व अपघात यांचे योग्य व्यवस्थापन व प्रथमोपचार, संदर्भसेवेपूर्वी रुग्णाला जीविताचे धोक्याबाहेर आणणे, श्वानदंश, विंचूदंश, सर्पदंश व इतर तातडीच्या रुग्णांना योग्य सेवा देणे.
संदर्भसेवा :- ज्या रुग्णाला विशेषज्ञांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना योग्य व तत्पर संदर्भसेवा :- रुग्णांना पुर्वपदावर आणणे ( Stablization ) संदर्भसेवेच्या प्रवासा दरम्यान रुग्णांना योग्य त्या अनुषंगिक सेवा देणे. प्रा.आ.केंद्गाच्या वाहनातून अथवा वैद्यकीय अधिकार्‍यांजवळ असलेल्या उपलब्ध अनुदानातून, भाडयाच्या वाहनातून संदर्भसेवा देणे.

 आंतररुग्ण सेवा ( ६ बेड )कुटूंब कल्याण्स सेवा

योग्य कुटूंबनियोजनाच्या पध्दती अवलंबिण्यासाठी शिक्षण, मतपरिवर्तन व समुपदेशन करणे. गर्भनिरोधक साधने उपलब्ध करुन देणे. उदा.निरोध, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तातडीच्या वेळी घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तांबी इ. कायमस्वरुपी पध्दती जसे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया , पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया/बिनटाकाच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसारख्या कुटूंबनियोजनाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबिलेल्या योग्य जोडप्यांसाठी पाठपूरावा सेवा प्रशिक्षित व्यक्त्‌ी व साधने उपलब्ध आहेत अशा ठिकाण डाटा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय गर्भपाताच्या सेवा व त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणेत येईल.
वरील सेवांखेरील प्राथमिक आरोग्य केंद्ग जननी सुरक्षा योजनेच्या सुविधाही पुरवतील.

प्रजनन संस्थेचे आजार / लैगिक आजारांचे व्यवस्थापन

प्रजनन संस्थेचे आजार/लैंगिक आजार यांच्या प्रतिबंधनासाठी आरोग्य शिक्षण प्रजनन संस्थेचे आजार/लैगिक आजार यांचा उपचार. आहारविषयक सेवा (एकात्मिक बालविकास सेवा योजनेबरोबर समन्वयाने) शालेय आरोग्य :- नियमित तपासणी, योग्य उपचार, संदर्भसेवा व पाठपूरावा. पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा :- जीवनकौशल्या प्रशिक्षण, समुपदेशन, योग्य उपचार. सुरक्षित पाठपुरावा व स्वच्छता यांसाठी प्रवृत्त करणे. त्या भागात कायमस्वरुपी आढळणारे आजार. उदा.हिवताप, काला आजार, जपानी, मेंदूदाह इत्यांदीचे प्रतिबंधन व नियंत्रण. रोगसर्वेक्षण आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण अस्वाभाविक आरोग्य घटनांबाबत जागरुकता व योग्य उपाययोजना पाणी साठयांचे निर्जुंतीकरण पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी राष्ट!ीय साथरोग नियंत्रण संस्थेने तयार केलेल्या भ्‌२े स्ट!ीपच्या टेस्टच्या सहाय्याने करावी. सेप्टीक संडासचा वापर, कचर्‍याची योग्य विल्हेवाट यांसह स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणे. जीवनविषयक आकडेवारीची संकलन व अहवाल सादरीकरण. आरोग्य/शिक्षण वर्तणुकीतील बदलासाठी संदेशवहन. राष्ट!ीय एडस नियंत्रण कार्यक्रमासह इतर राष्ट!ीय आरोग्य कार्यक्रम राबविणे. नेहमीच्या व तात्काळ उपचार सुविधा – या सेवा

  • जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्गात येतात त्यांना व जे रुग्ण उपकेंद्गावरुन अथवा अन्य ठिकाणांहून संदर्भसेवा दिल्याने येतात त्यांना या सेवा उपलब्ध व्हाव्यात. या सेवात खालील गोष्टींचा समावेश होतो.

उपचार देणे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्गात उपचार करणे शक्य नसलेल्या रुग्णांना संदर्भसेवा. रुग्णालयात दाखल करावायाची गरज आहे अशांना आंतररुग्ण उपचार देणे.

© Copyright जिल्हा परिषद जालना    Powered By : TechBeats Software Pvt Ltd.

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.

Melbourne, Australia
(Sat - Thursday)
(10am - 05 pm)
Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.

Cryptocurrency
Business Construction
Business Coach
Consulting
Immigration
Finance 2
Corporate 1
Corporate 2
Corporate 3
Consulting
Business 1
Business 2
Business 3
IT Solution
Tax Consulting
Human Resource
Life Coach
Marketing
Insurance
Finance RTL
Marketing
Consulting
Consulting